Monday, 22 January 2018

२०१७ संपताना

चालता चालता थांबलो क्षणभर,
वाटले, चालली वाट पहावी एकदा,
वळून पाहता मागे,
वाटले होते जे भयंकर,
आता वाटते करावे ते पुन्हा एकदा,

ऐकल्या वाटेचा सोबती मी,
मिळाली साथ तिला आठवणींची,
रंगला हा प्रवास क्षणांचा,
जणू ऐकली प्रत्येक हाक मनाची,

नव्हते, ते हाती आले,
अनोळखी, आता नाते झाले,
मागून ही न मिळणारे मिळत होते,
आपणच सारे फुलत होते,

नकळत संपला प्रवास इथला,
न जाणे उद्या मी मार्ग कुठला,
वळून पाहीन जेव्हा कधी मागे,
जाणवतील मनात गुंतलेले हे धागे,
मनात गुंतलेले हे धागे..

No comments:

Post a Comment