बोलायचे आहे त्याला पण शब्द मिळेना
गुणगुणायचे आहे तिला पण सुर काही जुळेना
भेटतात दोघे एकमेकांचा नजरेने
पण प्रत्यक्ष भेट काही होईना
किती लावशील आस अजुनी
हे कोड़े काही सुटेना
बरस ना रे तू मुक्त होउनी
दे त्या शब्दांना वाट करुनी
वाहु दे त्या कवी मनाच्या भावना
सुरांना ही आता शांत राहवेना
बरसं ना रे आता मुक्त होउनी
भेटू देत दोघांना चिंब होउनी ...
No comments:
Post a Comment